तळीरामांसाठी खुशखबर!! रात्री कीती वाजेपर्यंत दारू मिळणार?
नवीन वर्ष्याच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यासाठी बहुतेकांचे प्लॅनही ठरले आहेत. अनेकजण वेगवेगळ्या मार्गानी नववर्षाचे स्वागत करत असतात.
त्यातच आता मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने येणाऱ्या 24,25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत मद्यविक्रीसाठी (Liquor) दुकानदारांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे तसेच त्यांची नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली जाणार आहे असे म्हणलं तर वावगं ठरणार नाही
भारतीय संविधानाच्या महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) नुसार ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी मद्यदुकाने रात्रीपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर विदेशी मद्य विकणाऱ्या दुकानासाठी दुकान सुरु ठेवण्याची वेळ ही रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत असणार आहे. उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली FL -2 अनुज्ञप्तीसाठी रात्री साडे अकरा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवता येणार आहे. तसेच FLW -2 साठी रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्याची परवानगी आहे.
Beer Bar साठी रात्री 12 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री करता येणार आहे. केवळ Beer बारच नाही तर क्लबला देखील सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत क्लब चालू ठेवण्यास परवानगी असली तरी देखील पोलीस आयुक्तांचे परिक्षेत्र सोडून रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत क्लब सुरु राहणार आहे. तसेच FLBR -2 प्रकारच्या मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
https://www.navgannews.in/general-knowledge/36777/