भारतीय व्हिस्की ब्रँडला जगातील सर्वात उत्तम व्हिस्कीचा पुरस्कार
भारताच्या मद्य उत्पादन कंपन्या जागतिक पातळीवर नाव करताना दिसत आहेत. भारतीय व्हिस्की ब्रँडला जगातील सर्वात उत्तम व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची चढाओढ सुरु झालीये.
इंद्री सिंगल माल्ट इंडियन व्हिस्कीने हा पुरस्कार काही महिन्यांपूर्वी पटकावला आहे.
इंद्रीला २०२३ चा ‘व्हिस्की ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर ही व्हिस्की बनवणारी कंपनी Piccadily Agro Inds Limited च्या शेअर्सची मागणी वाढली आहे. कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कंपनीच्या यशामुळे भारताचा ३३ अब्ज डॉलरचा मद्य बाजार नव्या वळणावर आला आहे.
२०२१ मध्ये हरियाणा मध्ये Piccadily Agro Inds Limited कंपनीने व्हिस्की निर्मितीची सुरुवात केली. दोन वर्षांतच कंपनीने कमाल दाखवली आहे. आतापर्यंत कंपनीने १४ जागतिक पुरस्कार जिंकले आहेत. कंपनी आता दिवसाला १० हजार इंद्री व्हिस्की बॉटलचे उत्पादन करत आहे. इंद्री व्हिस्कीची निर्मिती ज्या पद्धतीने केली जाते, त्यामुळे ही व्हिस्की खास ठरते.
कुठे मिळते व्हिस्की
मद्याच्या किंमती भारताच्या वेगळ्यावेगळ्या राज्यात वेगळ्या-वेगळ्या आहेत. इंद्री व्हिस्की सध्या भारताच्या १९ राज्यांमध्ये मिळते, तर जगातील १७ देशांमध्ये उपलब्ध आहे. दोन वर्षांतच कंपनीने मोठी भरारी घेतली आहे. कंपनीचा प्लँट हरियाणामध्ये आहे. भारताचे व्हिस्कीचे मार्केट सध्या ३३ अब्ज डॉलरचे आहे. इंद्री व्हिस्कीच्या मार्केटमधील प्रवेशामुळे यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.