एकीकडे घर, दार संसार आणि दुसरीकडे सच्चा प्यार,प्रेमाच्या धुंदीत ज्योतीने आपल्याच कुकुंवाला पुसलं
साप्तपदी घेऊन संसार थाटला. ज्याच्याबरोबर सात जन्मसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. त्याच नवऱ्याला एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय.
नवरा प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने तीने नवऱ्याचा गळा आवळला. पत्नीची क्रूरता इथेच थांबली नाही. तिने पतीच्या देहाला अक्षरश: जंगल शिवारातील गटात फेकून दिलं आहे.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातल्या मडगी येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. 35 वर्षीय ज्योती राऊत आणि तीचा 36 वर्षीय पती विक्की करकाळे यांच्यात प्रेमसंबंध होते. ज्योती विवाहीत होती. मदन राऊतशी तीने संसार थाटला होता. पण नवऱ्याच्या पाठीमागे ज्योतीचे विक्कीशी प्रेमसंबंध होते.
ज्योती आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात धुळ फेकत होती. एकीकडे घर, दार संसार आणि दुसरीकडे सच्चा प्यार. असा डबलगेम ज्योतीने केला. शेवटी नवरा आणि प्रियकर या दोघांमधून ज्योतीने प्रियकराची निवड केली आणि दुसऱ्याला कायमचं संपवून टाकलं.
प्रेमाच्या धुंदीत ज्योतीने आपल्याच कुकुंवाला पुसलं. स्वत:च्या हाताने तीने नवऱ्याचा (Husband) गळा आवळला. ज्योती आपल्या नवऱ्याकडून घटस्पोट घेऊ शकत होती. ती कायदेशीर हे नातं नाकारू शकतं होती, पण तीने वेगळा मार्ग निवडला. नवऱ्याला संपवून ज्योतीने प्रियकराबरोबर नवीन संसार थाटायचा विचार केला असावा. पण तीचे आणि तिच्या प्रियकराचे हात रक्ताने माखलेत याचा त्यांनी विचार केला नसावा. म्हणून लग्नबंधनात अडकण्यापूर्वीच ते कायद्याच्या कचाट्यात अडकले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत अटक केली