व्हिडिओ न्युज

Video देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती माझ्यासाठी व्हीआयपी – पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातील हजारो लाभार्थी सहभागी झाले होते.

तसेच देशभरातील दोन हजारांहून अधिक व्हीबीएसवाय व्हॅन, हजारो कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) या यात्रेशी जोडले गेले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार तसेच स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी आपल्यासाठी देशातील गरीब व्यक्ती हे व्हीआयपी असल्याचं सांगितलं.

माझ्यासाठी या देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती माझ्यासाठी व्हीआयपी आहेत. नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात नागरिकांना मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, हे निकालावरून दिसून आले. ज्यांनी माझ्या गॅरंटीवर विश्वास दाखवला त्या सर्वांचा मी आभारी आहे. तर काही राजकीय पक्षांना हे समजत नाही की, खोटी आश्वासने देऊन त्यांना काही साध्य करता येणार नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी परत एकदा काँग्रेसवर टीका केली.

देशभरातील गावांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी कुटुंबियांनी आमच्या सरकारच्या कोणत्यां कोणत्या योजनांचा लाभ घेतलाय. लाभ मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढत असतो. आयुष्य जगण्यास नवीन ताकद मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थीशी संवाद साधला. ‘विकसित भारत संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने लोक उत्साहाने सहभागी होत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत असल्याचं मोदी म्हणाले.

माझ्यासाठी देशातील गरीब व्यक्ती व्हीआयपी आहे. देशातील प्रत्येक माता- बहीण, मुलगी माझ्यासाठी व्हीआयपी आहे. देशातील शेतकरी, युवक माझ्यासाठी व्हीआयपी आहे. मोदींची गॅरंटी मिळाल्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत जवळपास १० लाख नवीन लाभार्थ्यांनी मोफत गॅस कनेक्शनसाठी अर्ज केले. या यात्रेदरम्यान ३५ लाखांहून अधिक आयुष्मान कार्डही दिले.

‘तुमच्या सेवकाचा तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. मी मोदींची गॅरंटीवाल्या वाहनाने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मी येतो कारण मी तुमच्या इच्छा आणि आकांक्षा समजू शकेल. ते पूर्ण करण्यासाठी मी सरकारची सर्व शक्ती वापरेन!, असं मोदी यावेळी म्हणाले. जर विरोधी पक्षांनी राजकीय स्वार्थाऐवजी सेवेची भावना मनात ठेवली असती. या सेवेच्या भावनेलाच आपले काम मानले असते, तर देशाची मोठी जनता गरिबी, दु:खात राहिली नसती, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button