बीड धक्कादायक अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ त्याने केले रेकोर्ड ,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अन..
बीड : शहरामध्ये असलेल्या मिलिया माध्यमिक शाळेतील आमेर काझी या शिक्षकाने सहकारी शिक्षकेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. दरम्यान, आता याच प्रकरणी आता मिलिया शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अमीर काझी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेर काझी या शिक्षकाने शाळेतील अनेक शिक्षकांसोबत अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्यानंतर हे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाल्यानंतर शाळेची (School) मोठी बदनामी झाली. त्यामुळे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून आता अमेर काझी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर काझी याबरोबरच अश्लील व्हिडिओमध्ये असलेल्या महिला शिक्षकांना देखील शाळेने निलंबित केले आहे. तर, या प्रकरणात दोषी असलेल्या काही शिक्षकाने स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
बीड शहरात अंजुमन इशात ए तालीम या संस्थेची मिलिया नावाची शाळा आहे. याच शाळेत आमेर काझी नावाचा एक शिक्षक नोकरी करत होता. दरम्यान, काझी याने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत त्याच शाळेतील वर्गखोलीमध्ये अश्लील कृत्य केले. धक्कादायक म्हणजे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ देखील त्याने रेकोर्ड केले होते. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाने काही महिला शिक्षकांना निलंबित केले होते. तसेच काही शिक्षकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. मात्र, असे असतांना या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीर काझीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याला शाळा प्रशासना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता.
सुरवातीला संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि होत असलेल्या आरोपाशी आपला कोणताही संबध नसल्याची भूमिका शाळा प्रशासनाने घेतली होती. धक्कादायक म्हणजे, आमेर काझीने 2012 ते 2023 या कालावधीत शाळेतील काही शिक्षिका आणि इतर महिलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच, त्याने याचे व्हिडिओ तयार करून ते व्हिडीओ काही वेबसाईटला विकल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. हे सर्व प्रकरण माध्यमांनी लावून धरल्यावर अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून अमेर काझी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.