मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर, कल आले
राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. या चारही राज्यांमधील निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष आहे.
त्यातही राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या तिन्ही राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार कलही हाती येत आहे. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होताना दिसून येत आहे. पहिल्या कलानुसार मध्यप्रदेशात काँग्रेस आणि राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात सत्ताबदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मध्यप्रदेशात भाजप 130तर काँग्रेस 85 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानात भाजप 103 आणि काँग्रेस 90जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 40 आणि भाजप 38जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणातही काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 52 तर सत्ताधारी बीआरएसला 28 जागा मिळताना दिसत आहे. भाजप आणि एमआयएम प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर आहे.