Video बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका कामगार तब्बल 17 दिवस या ठिकाणी कसे राहिले
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सिल्क्यरा बोगद्यात सुमारे 17 दिवस अडकलेल्या सर्व 41 कामगारांची मंगळवारी संध्याकाळी विविध यंत्रणांच्या संयुक्त बचाव मोहिमेचा भाग म्हणून सुटका करण्यात आली.
Visuals of the 2-km stretch inside Silkyara tunnel in Uttarkashi where 41 workers were trapped for 17 days, before they were rescued on November 28.
In the video, made by one of the trapped workers, they can be heard motivating each other. pic.twitter.com/ds2k8W7Jis
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2023
सर्व कामगारांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. कामगार बाहेर आल्यानंतर आता ते बोगद्यात ज्या ठिकाणी अडकले होते तिथला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवरून आपण कल्पनाही करू शकत नाही, की हे कामगार तब्बल 17 दिवस या ठिकाणी कसे राहिले असतील. 28 नोव्हेंबर रोजी त्यांची सुटका करण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. 12 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधण्यात येत असलेल्या सिल्कियारा बोगद्यात ढिगारा कोसळल्याने 41 कामगार आत अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच अनेक संस्थांनी संयुक्त बचाव मोहीम राबवली