ताज्या बातम्या

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक


रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर तसेच सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, २ जुलै रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.



मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड-माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.‌ त्यामुळे ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर कुर्ला व सायन स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल मुलुंड-माटुंगा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व सायन स्थानकावर थांबतील. तर पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग वगळून) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल व ठाणे स्थानकातून पनवेलसाठी जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत चचगेट-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी वाशी विशेष लोकल सेवा!

दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- शी भागात विशेष लोकल धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईनवर लोकल सेवा उपलब्ध असतील.

कधी व कुठे

मध्य रेल्वे मार्ग

मुलुंड-माटुंगा- स. ११.०५ ते ३.५५

हार्बर मार्ग

पनवेल-वाशी – स. ११.१० ते ४.०५

पश्चिम रेल्वे मार्ग

चचगेट-मुंबई सेंट्रल – १०.३५ ते ३.३५


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button