मालाने भरलेले ट्रॅक्टर वाहत्या पाण्यातून पुलावरून
मनमाड : राज्यात सगळीकडेच पावसाची संततधार सुरु आहे. नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. अशा स्थितीत रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद होतात.https://www.facebook.com/news18pune/videos/370095508565571/
मात्र अशा वेळी काहीजण नसतं धाडस करतात आणि वाहत्या पाण्यातून बाईक, कार, गाडी काढण्याचा प्रयत्न करतात. असं करताना अनेक जण वाहून गेल्याचे व्हिडीओ देखील माध्यमांमधून प्रसारित झाले आहेत. मात्र तरीही लोक वाहत्या पाण्यात गाडी टाकतात. मनमाडमधील कळवण भागात असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
ज्यात एक तरुण मालाने भरलेले ट्रॅक्टर एक जण वाहत्या पाण्यातून पुलावरून चालवत आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना तिथे झाली नाही. मात्र अशी स्टंटबाजी जीवावर बेतल्याने अनेकदा समोर आलं आहे. तर दुसऱ्या घटनेत पुलावरून पुराचे पाणी वाहत असतांना जीव धोक्यात घालून त्यातून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूरमध्ये स्कॉर्पिओ वाहून गेली, सहा जणांना जलसमाधी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख मार्गावरील पुलावरुन स्कार्पियो वाहन वाहून गेल्याची घटना काल घडली. यात 5 ते 6 प्रवासी पुरात वाहून गेल्याची माहिती पुढे येत आहे. काल दुपारी 3 वाजता ही घटना घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
यात स्कार्पियो गाडीत काही लोक असल्याचे पाहायला मिळत आहेत.पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.