नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासल ; १० ते १५ अज्ञातांवर गुन्हा दाखल
लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नामदेव जाधवांच्या तक्रारीनुसार दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल दुपारी नामदेव जाधव भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासल्याच्या प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काही जणांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले होते.
घटनेची नोंद घेत आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा ही हत्या असल्यांच नामदेव जाधवांनी म्हटलं आहे.
“मराठा आरक्षणावर मी भूमिका मांडत असताना, मराठा समाजाला आरक्षण शरद पवार यांच्यामुळेच मिळालं नसल्याची कागदपत्र माझ्या हाताला लागली होती. हे सत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे शिवजयंती अॅट सिंगापूरचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावला. तसेच माझ्यावर हल्ला केला.”, असा आरोप जाधवांनी केला आहे.
हा हल्ला म्हणजे फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची हत्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत यासाठी हा हल्ला करण्यात आला, असंही नामदेव जाधव म्हणाले.