बाप रे!!! तलावाचे पाणी अचानक झाले गुलाबी,नागरिकांनी किंवा पर्यटकांनी या तलावाजवळ जाऊ नये, तज्ञांनी दिला इशारा!
हवाई : आधुनिक काळात पर्यावरणाबाबत विविध घटना सतत घडत असतात अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये हवाईतील एका प्रख्यात तलावाचे पाणी अचानक गुलाबी झाल्याचे लक्षात आले आहे. हे गुलाबी झालेले पाणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
हवाईतील मौवी प्रदेशातील नॅशनल वाईल्ड लाईफ रिफ्यूजी या ठिकाणी हा तलाव असून त्याचे पाणी अचानक गुलाबी झाले आहे.
या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या आणि या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांनाही ही नैसर्गिक विचित्र घटना वाटत आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात अशा प्रकारे कधीही या तलावाच्या पाण्याने रंग बदलला नव्हता. या तलावाच्या प्रदेशाचे व्यवस्थापन बघणारे ब्रेड वुल्फ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सकाळी फिरायला जाणाऱ्या एका नागरिकाने या तलावाच्या पाण्याच्या रंगाबाबत काही विचित्र घडत असल्याची कल्पना प्रथम दिली. आम्ही जेव्हा तेथे गेलो तेव्हा या तलावाच्या पाण्याने आपल्याला निळा रंग बदलून गुलाबी रंग घेतला होता या पाण्याने आपला रंग का बदलला? याबाबत संशोधकांनाही आता चिंता वाटत आहे.
गेल्या काही वर्षापासून या प्रदेशामध्ये दुष्काळाचे सावट आहे. त्याचाच परिणाम म्हणून कदाचित या पाण्याने गुलाबी रंग धारण केला की काय, अशी एक शंका व्यक्त होत आहे. या पाण्यामध्ये काही विषारी द्रव्य मिसळली गेल्यामुळे त्याचा रंग बदलला का काय असा आहे एक शंका होती पण जेव्हा या पाण्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्य नसल्याचे समोर आले.
या तलावाच्या पाण्यातील क्षारांचे म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढल्यामुळे हे पाणी गुलाबी झाले असावे, असा एक वैज्ञानिक निष्कर्ष आता काढण्यात येत आहे. तलावाच्या पाण्यात पूर्वीपासूनच क्षारांचे प्रमाण जास्त होते. जोपर्यंत या तलावाच्या पाण्याने रंग का बदलला आहे याचे उत्तर सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी किंवा पर्यटकांनी या तलावाजवळ जाऊ नये, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.