चुलती बेडवर झोपलेली होती, पुतण्या घरात घुसला आणि…
अनैतिक संबंधास भाग पाडणं, महिलांची छेडछाड, विनयभंग, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कौटुंबिक पातळीवरदेखील असे गुन्हे घडत आहेत.
चुलता मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला असताना पुतण्याने चुलतीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं एक प्रकरण अलीकडेच घडलं. या प्रकरणात चुलतीनं गैरकृत्यास विरोध केला म्हणून पुतण्यानं तिला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनमधल्या दिडौली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका विवाहित महिलेची तिच्या दीराच्या मुलानं छेड काढली. तसंच तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. तिनं या गोष्टींना विरोध केला असता या व्यक्तीनं आणि त्याच्या आईने पीडित महिलेला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्यांदा पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित महिलेनं न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर पोलीस कारवाईला वेग आला आहे. ‘दैनिक जागरण’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दिडौलीमधील एका गावात राहणारा मजूर डेहराडूनमध्ये मजुरीचं काम करतो. त्याची पत्नी मुलांसोबत गावी राहते. या विवाहित महिलेचा पुतण्या रितीकची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिची वारंवार छेड काढत असे. 28 ऑगस्टला रात्रीच्या वेळी ही महिला घराच्या अंगणात झोपली होती. तेव्हा रितीक भिंतीवरून उडी मारून चुलतीच्या घरात घुसला आणि तिला वाईट हेतूनं स्पर्श करू लागला. तिनं रितीकला असं कृत्य करण्यास विरोध केला असता त्याने मारहाण सुरू केली. पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता आजूबाजूचे लोक जमा झाले. तेवढ्यात तिथं रितिकची आई आली. तिनं रितिकला रोखण्याऐवजी पीडित महिलेलाच मारहाण सुरू केली. या प्रकरणी आई आणि मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘आई आणि मुलाविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार त्यागी यांनी दिली.
दरम्यान, तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित महिलेनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर याप्रकरणी पोलीस कारवाई सुरू झाली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.