नात्यालाच काळीमा,काकाचे पुतणीसोबत अनैतिक संबंध, दुसऱ्या तरुणासोबत बोलल्याने पुतणीला संपवलं..
अहमदनगर: दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहीत पुतणीला संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडली आहे.
या घटनेने मोठी खळबळ उडली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात काकाचे देखील पुतणी सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दोन्ही पायावर कु-हाडीने वार
विवाहानंतर गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहणारी 21 वर्षीय विवाहित पुतणी ही घराबाहेर येऊन रात्रीच्या वेळेस एका मुलासोबत बोलत होती. दुसऱ्या मुलीसोबत बोलते याचा काकाला राग आला. रागाच्या भारात काकाने पुतणीवर संशय घेत वाद घालण्यास सुरूवात केली आहे. या वादानंतर रागाच्या भरात काकाने दोन्ही पायावर कु-हाडीने वार करून तीला जबर जखमी केले. हल्ल्यानंतर तरूणीने आराडाओरडा केल्यानंतर नातेवाईक गोळा झाले.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दरम्यान आजूबाजूच्या रहिवाशांनी पुतणीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी कुऱ्हाड व मोबाईल अंधारात फेकून पळून जाण्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल आहे. आरोपी काकाचे मृत पुतणीशी शारीरिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी काका याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.