आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा कशी असते
आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने मोठा महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत निघालेले वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतात. चंद्रभागेच्या पात्रात स्नान करावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ही या भक्तांची इच्छा असते.
आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. शेकडो मैलांवरून आलेले वारकरी आता विठुरायाचे दर्शन घेत आहे. भक्तांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थानाकडून 24 तास विठुरायाचे दर्शन सुरु ठेवले आहे.
यंदाची आषाढी एकादशीची महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde in pandharpur) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पुर्ण झाली आहे.
चार प्रमुख पुजारी पैकी संदीप कुलकर्णी यांच्याकडे प्रमुख म्हणजे मंत्रोच्चार करण्याचे काम असते. यामुळे त्या दिवशी संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले असते. तर या मंत्रोच्चार प्रमाणे उपचार करण्याची जबाबदारी सुनील गुरव यांच्याकडे असते. देवाला स्नान घालणे गंध लावणे, पोशाख करणे, मुकुट डोक्यावर ठेवणे इत्यादींचा यामध्ये समावेश असतो. महापूजा करते वेळी मंत्रोच्चार करणे जसे महत्वाचे आहे. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देवा समोर यावेळी अभंग म्हणण्याची परंपरा आहे. यामधून वारकऱ्यांची देवाप्रती असलेली भावना मांडली जाते. ती जबाबदारी केशव नामदास पार पाडतात. अशा मंगलमय वातावरणात ही महापूजा संपन्न होते.