जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या,अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण …
अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे चार ते पाच डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. कोणी प्रवाशी आतमध्ये अडकलाय का हे तपासलं जात आहे. सदर घडनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
शिराडोह परिसरात ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पाच डब्यांना भीषण आग लागल्याचं समजतंय. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.
Maharashtra | Five coaches of an 8-coach DEMU train caught fire at 3 pm between Ahmednagar and Narayanpur stations. No injuries or death reported as all passengers debaorded the train when it caught fire. No person is trapped inside the burning coaches. Firefighters are called by…
— ANI (@ANI) October 16, 2023
सीपीआरओ सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ८ कोचच्या DEMU रेल्वेला तीनच्या सुमारास अहमदनगर आणि नारायणपूर स्टेशनदरम्यान आग लागली. आग लागताच प्रवाशी डब्ब्यांच्या बाहेर पडले, त्यामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. कोणताही प्रवाशी रेल्वेच्या डब्ब्यात अडकलेला नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या रेल्वे प्रशासनाकडून बोलावण्यात आल्या होत्या.