ताज्या बातम्यादेश-विदेश
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह न चुकता 30 वर्षाहून अधिक काळापासून पंढरपूरला वारी करतात
आषाढी एकादशीला वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. राज्यभरातून पालख्या आज पंढरपुरात दाखल होतात. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पण या सामान्य, वारकऱ्याप्रमाणेचं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह न चुकता 30 वर्षाहून अधिक काळापासून पंढरपूरला हजेरी लावतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दर आषाढी एकादशीला शासकीय विठ्ठल रुख्मिणी पुजा करण्याची परंपरा आहे. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी पंढपूरात येण्यास सुरुवात केली. आता मुख्यमंत्री नसले तरी ते दरवर्षी आषाढीला येतात. 1992 सालापासून ते नियमित वारी करतात.