पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, दर्शन रांग येथे भाविकांची गर्दी
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे
पंढरीत येणाऱ्या दिंडय़ा, पालख्यांना राहुटय़ा, तंबू उभारून निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून प्रशासनाच्या वतीने भक्तिसागर 65 एकर येथे मोफत जागा (प्लॉट), वीज, पाणी, शौचालये, आरोग्यसेवा, पोलीस संरक्षण पुरवण्यात येते. यामुळे येथील सर्व 480 प्लॉटचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
शहरावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहराबाहेर नदीच्या पैलतीरी 65 एकर जागेत भाविकांसाठी जागा मोकळी ठेवून राहुटय़ा, तंबू उभारण्याची सोय केलेली आहे. येथील स्वच्छता करण्यात आली असून, 480 प्लॉट तयार करण्यात आले होते. या सर्व प्लॉटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. जसजसे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज व अन्य संतांच्या पालख्या पंढरीच्या समीप येत आहेत. तसतशी पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, दर्शन रांग येथे भाविकांची गर्दी दिसून येते. 65 एकर येथे भाविकांच्या सुविधेसाठी आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्रे उभारण्यात आली आहेत.