महत्वाचे

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करून देखील कोलेस्ट्रॉल सहजपणे नियंत्रणात आणू शकता


खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची समस्या वाढली आहे. अनेक लोक हाय कोलेस्ट्रॉलने त्रस्त असून कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास रुग्णाला हार्ट अटॅक स्ट्रोक येण्याचा देखील धोका असतो.

अशात कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करणे महत्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी अनेक लोक विविध उपाय आणि औषध उपचारांचा अवलंब करतात, परंतु तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करून देखील कोलेस्ट्रॉल सहजपणे नियंत्रणात आणू शकता.सफरचंद : कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी सफरचंद हे फळ खूप फायदेशीर ठरत. हेल्थलाइनच्या अहवालानुसार सफरचंदमध्ये सॉल्यूबल फाइबरची भरपूर मात्रा असते त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. एका अभ्यासातून समोर आलं आहे की दररोज सकाळी उठून दोन सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची लेव्हल 50 टक्के कमी केली जाऊ शकते.

सफरचंदमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. तसेच सफरचंद खाल्ल्याने डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली राहते.संत्र : संत्री सारखी फळं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, अँटी ऑक्सिडंट्स आणि अन्य पोषक तत्व असतात. संत्री ऐवजी द्राक्ष, बेरीज ही फळ देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदशीर ठरतात.एवोकाडो : एवोकाडो खाण्याने शरीराला अनेक फायदे आहेत.

एवोकाडो शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करते. एवोकाडो मध्ये ओलिक एसिड असून ते ब्लड फ्लो च्या मध्ये येणारे कोलेस्ट्रॉलला बाहेर काढते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.केळ : केळ खाण शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जात. केळ पचनक्रिया उत्तम ठेवण्यासोबतच वजन वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरले.

केळ्यात . सॉल्यूबल फाइबरचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, केळ खाल्लयाने ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते आणि इम्यूनिटी देखील मजबूत होते.अननस : अननस हे आंबट गोड फळ असून कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी याच सेवन फायदेशीर ठरू शकत. अननसमध्ये विटामिन आणि मिनरल्सचे भरपूर प्रमाणात असते. अननस शरीरातील ब्लड फ्लो इंप्रूव करतो आणि हृदय देखील चांगले ठेवतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button