अनंतनागमध्ये भारतीय सेनेला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या हँडलर्सला जिवंत पकडण्यात यश
जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळालंय. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झालाय.
यावेळी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी शुक्रवारी (दि.१५ सप्टेंबर) ही माहिती दिली. उत्तर काश्मिरमधील बारामुल्ला येथील उरी भागातून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि पाच ग्रेनेड जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे दोन दहशतवादी बारामुल्ला येथील रहिवासी असून जैद हसन मल्ला आणि मोहम्मद आरिफ चन्ना अशी त्यांची नावं आहेत. “दोघेही पाकिस्तानातील त्यांच्या हँडलरच्या सांगण्यावरुन सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तस्करी होते आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी हे शस्त्रे आणि दारूगोळा लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना देता होते,” असे पोलिसांनी आपल्या माहितीमध्ये सांगितले आहे.
या दोन दहशतवाद्यांना बारामुल्ला पोलीस आणि भारतीय सेनेच्या 8व्या राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त कारवाई दरम्यान उरी सीमा परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, “उरी येथील परनपिलन पुलावर नाका तपासणीदरम्यान, संयुक्त पथकाने दाचीहून परानपिलन पुलाकडे येणाऱ्या दोन संशयित व्यक्तींना पाहिलं आणि पोलिसांना पाहताच दोन्ही संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु संयुक्त पथकाला त्यांना पकडण्यात यश आलं.”