ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र
चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात झिका व्हायरसचे दोन रुग्ण
महाराष्ट्रात झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे हे झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले असून दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या दोन्ही व्यक्ती या ज्येष्ठ नागरिक आहेत. एका व्यक्तीचे वय 78 वर्षे तर दुसऱ्या व्यक्तीचे वय 75 वर्षे इतके आहे. गेल्या 15 दिवसांत झिका विषाणूचा संसर्ग झाल्याची ही प्रकरणे समोर आली आहेत. दोन्ही रुग्णांना ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे जाणवत होती आणि त्यानंतर त्यांची तपासणी केली असता झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.