क्राईम

पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी देऊन, प्रियकराच्या मदतीने काढला काटा….


राजस्थानात कोटामध्येही पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याचं उघड झालंय.



या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजस्थानात कोटामधल्या चेचट पोलीस ठाण्याच्या भागात काही दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. त्या तरुणाच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर असल्याचं स्पष्ट झालंय. पत्नीने या कामासाठी 30 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्या बदल्यात आरोपीने त्या तरुणाला संपवलं.

पोलिसांच्या मते, लालचंद या तरुणाचा मृतदेह कंवरपुरा गावातल्या 8 लेन रस्त्यावरच्या छोट्या पुलाजवळ मिळाला होता. तो कंवरपुरा इथलाच रहिवासी होता. त्याला मारणाऱ्याचं नाव दुर्गालाल बागरी आहे. तो गुडाला गावचा रहिवासी आहे. 30 हजार रुपयांच्या बदल्यात त्यानं लालचंदवर सळईनं वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावरही त्याने हल्ला केला.

पत्नीचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
या घटनेत पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीचा प्रियकर मनोज लोधा याला आधीच अटक केली होती. तोदेखील कंवरपुरा इथलाच रहिवासी आहे; मात्र लालचंदची पत्नी मनवरबाई अजून पोलिसांना सापडलेली नाही. मनवरबाई व मनोज यांनी लालचंद याची हत्या करण्यासाठी दुर्गालाल याला 30 हजार रुपयांची सुपारी दिली होती.

सळईने वार करून केली हत्या
तिघांनी लालचंद याला पहिल्यांदा गावातल्या छोट्या पुलाजवळ बोलावून त्याला दारू पाजली. मग त्याच्या डोक्यावर दुर्गालाल यानं सळईनं वार केले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. मनवरबाई आणि आरोपी मनोज याचे विवाहबाह्य संबंध होते. ही गोष्ट लालचंदला माहीत झाली होती. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी मनवरबाईने तिच्या प्रियकराची मदत घेऊन लालचंदच्या हत्येची सुपारी दिली.

लालचंद कमलपुरा इथल्या लष्करी ढाब्यावर काम करत होता. तो कधीकधी गावी यायचा. काही दिवसांपूर्वी तो रामगंजमंडी इथं कामाला जाण्यासाठी घरून निघाला; पण त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याचा फोनही बंद होता. दरम्यान त्यानंतर त्याचा फोनही बंद होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह गावातल्या पुलाजवळ मिळाला. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणात लालचंद याची पत्नी, तिचा प्रियकर व हत्या करणारा हे तिघंही आरोपी आहेत; मात्र पत्नी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button