महत्वाचेमहाराष्ट्र
घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात करण्यात आली आहे. तसेच उज्ज्वला योजने अंतर्गत सिलिंडरवरचे दरही 200 रुपयांनी कमी केले आहेत. दरम्यान, या वर्षी राजस्थान, मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गॅस स्वस्त केल्याचे सांगितले जात आहे.
महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनता खास करून गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करण्याची सरकारने घोषणा केली आहे. तर उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे.