ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातफेरे अधुरे. लग्नापूर्वी मुंबईत आले अन् जीवाला मुकले, हॉटेलमधील आगीत उद्योगपतीही दगावला


मुंबई: रविवारी दुपारी सांताक्रूझ पूर्वेकडील गॅलॅक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत (hotelfire) तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुपल धांजी (वय 25), किशन एम. (वय 28) आणि कांतीलाल वारा (वय 48) अशी मृत नागरिकांची (3 dead) नावं असून ते नैरोबीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचे प्रवासी होते.
मात्र फ्लाइटला उशीर झाल्याने विनाम कंपनीतर्फेच त्यांची या हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती, असे समजते. ग्राउंड प्लस चार मजले असणाऱ्या या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ही आग लागली . त्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या भीषण आगीत हॉटेलमधील दोन खोल्या आणि लॉबीमधील इलेक्ट्रिक वायरिंग, पॉवर इन्स्टॉलेशन, एसी, पडदे, मॅट्रेस आणि लाकडी फर्निचर जळून खाक झाले. रुपल कांजी, किशन एम आणि वारा यांचे मृतदेह 80 ते 100 टक्के जळालेल्या अवस्थेत खोली क्रमांक 304 मध्ये आढळले.

व्यावसायिक असलेले कांतीलाल हे 302 क्रमांकाच्या खोलीक होते, मात्र आगीमुळे ते पॅनिक झाले आणि रुपल व किशन रहात असलेल्या खोली क्रमांक 304 गेले, अशी माहिती समोर आली आहे.

नक्की काय झालं ?

जोसेफ फर्नांडिस या नाईट मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार खोली क्रमांक 204 च्या एअर कंडिशनिंग युनिटमध्ये आग लागल्याचे समोर आली आहे. त्या खोलीत एका नव्या इसमाने नुकतेच चेक -इन केले. त्याने एसी सुरू केला असता स्पार्क झाला आणि त्याने घाबरून खोलीचं दार बंद करत तो आम्हाला सांगायला. मात्र तो पर्यंत खोलीतील पडद्याला आग लागली आणि ती वर पसरली, असे ते म्हणाले.

आगीचे वृत्त कळताच हॉटेलमधील स्टाफने इतर रुम्समधील पाहुण्यांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. 204 च्या पुढल्याच खोलीत आदर्श श्रीवास्त हे त्यांच्या मित्रासोबत होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक वीज गेली अन मोठा आवाज आला. कोणीतरी रूमच्या दरवाजावर सतत नॉक करत होते, आम्ही दरवाजा उघडला असता सर्वत्र धूर परसला होता. हातातील सर्व गोष्टी तिथेच टाकून आम्ही जीव वाचवण्यासाठी खाली धाव घेतली, असे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेत बळी पडलेल्या तिघांना तातडीने नजीकच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासांठी दाखल करण्यात आले मात्र तेथए त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याशिवाय हॉटेलमधील इतर काही कस्टमर्सनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत आहे.

आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न सुरू केले, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, शिडी, तीन लहान होज लाइन आणि हाय-प्रेशनर फर्स्ट एड लाइनच्या सहाय्याने आग विझवण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॉटलेला नुकतीच पाठवण्यात आली होती नोटीस

दरम्यान, 1966 मध्ये बांधलेल्या गॅलेक्सी हॉटेलला बीएमसीने अलीकडेच नोटीस बजावली होती. अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली होती. आम्ही हॉटेलच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे, परंतु अद्याप आमच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून हॉटेल व्यवस्थापनाचा काही निष्काळजीपणा होता का याचा तपास सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button