बीड : अजितदादांसमोरच धनंजय मुडेंचा थेट सवाल..
बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडतेय. या सभेतून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांनाच सवाल केला आहे. बीडने नेहमीच साहेबांचा (शरद पवार) आदर केला पण साहेबांनी (शरद पवार) बीडला काय दिले हा आजही प्रश्न आहे, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजित पवार गटाची सभा, ही उत्तर सभा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजची रॅली ही ज्येष्ठ साहेबांच्या (शरद पवार) रॅलीला उत्तर नसून बीडच्या जनतेच्या जबाबदारीची रॅली असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
बीडने नेहमीच साहेबांचा (शरद पवार) आदर केला पण साहेबांनी बीडला काय दिले हा आजही प्रश्न आहे, असा सवाल व्यासपीठावर धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. पण साहेबांचे उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला जर कुणी दिली असेल तर ते अजित दादांनी दिले , त्यामुळे हिंसभा उत्तराची नाही तर उत्तरदायित्वाची असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, अजित दादांची तुलना कोणत्याही फिल्मस्टारशी केली तर. मी नक्कीच म्हणेन की अजित पवारांना तो डायलॉग सूट होतो, तो म्हणजे “जो में बोलता हू वो में करके दिखाता हू, और जो में नहीं करता वो तो बिलकुल करता हू. आजचा मोर्चा अस्मिता आणि सन्मानासाठी तसेच दुष्काळी जिल्ह्याची सुटका करण्यासाठी असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
‘लोगो ने कोशिश की मुझे मिटटी में दबाने की, लेकिन वह भूल गए में बीज हूँ, मुझे आदत है बार बार उग जाने की’ असा डायलॉग देखील धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावरून मारला. अनेकांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरले होते की मी एक बीज आहे, असा डायल़ॉग मारून धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटातील नेत्यांना लक्ष्य केले आहे.