प्रत्येत संस्थेत ‘आरएसएस’चे लोक, मंत्रालयादेखील ते चालवतात : राहुल गांधी
लडाखच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आरएसएसवर जोरदार टीका केली आहे. युवकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशाच्या प्रत्येक संस्थेत स्वतःचे लोक ठेवत आहेआरएसएस -जो सत्ताधारी भाजपचा वैचारिक पालक आहे, तो सर्व काही चालवत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
लडाखच्या भेटीदरम्यान, राहुल गांधींनी आरएसएसवर प्रत्येक संस्थेत आपले सदस्य ठेवण्याचा आणि देशावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, आरएसएसचे लोक सर्व काही चालवत आहेत. तुम्ही केंद्र सरकारातील कोणत्याही मंत्र्याला विचारले तरी ते तुम्हाला सांगतील की प्रत्यक्षात ते त्यांचे मंत्रालय चालवत नाहीत तर त्यांचे ओएसडी आरएसएसने नियुक्त केले आहेत. तो सर्व काही चालवत आहे. त्यांनी अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. प्रत्येक संस्थेत ते सर्व काही चालवत आहे
देशात द्वेषाचे वाताव
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील फुटीरतावादाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राहुल गांधी म्हणाले की, ‘काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की,’ भारतात विविधता आहे, जी आपल्या देशाची ताकद आहे. लोकांमध्ये जाऊन खूप काही शिकायला मिळाले. आम्ही वेगवेगळ्या राज्यात गेलो. हजारो लोकांशी बोललो. देशातील प्रमुख प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण यावर फारसे बोलले जात नाही. एकतर द्वेषाची चर्चा आहे किंवा ऐश्वर्या राय, शाहरुख खानची चर्चा आहे. देशाच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा होत नाही..’रणत..