साहेब कामाच्या माणसाला ‘आशीर्वाद’ द्या; बीडमध्ये झळकले शरद पवारांना विनंती करणारे पोस्टर्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज बीड मध्ये मेळावा होणार आहे. या आधी पक्षातील बंडखोर अजित पवार यांच्या गटाने शरद पवारांचे स्वागत करणारे आणि राजकीयदृष्ट्या दुरावलेल्या पुतण्याला ‘आशीर्वाद’ देण्याची विनंती करणारे बॅनर लावले आहेत.
परळीत शरद पवारांच्या सभेच्या काही तास आधीपासून दोन्ही पवारांची छायाचित्रे असलेले राष्ट्रवादीचे बॅनर बीडमध्ये लावण्यात आले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्यातील विरोधी पक्षांची महाविकास आघाडी, ज्यात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचाही समावेश आहे.
12 ऑगस्ट रोजी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही पवारांची बैठक झाली.
त्या बैठकीत काय घडले यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं0, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले म्हणाले की त्यांच्या पक्षाचे नेते या महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणाऱ्या INDIA आघाडीच्या संमेलनात बैठकीबाबत चर्चा करतील.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यातील भेटीला ‘चिंतेचा विषय’ म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे की कुटुंबातील सदस्यांच्या भेटीला मीडिया वेगवेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहे, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. ही बैठक कौटुंबिक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी सोमवारी अजित पवारांच्या भेटीवरून महाविकास आघाडीत कोणताही गोंधळ नसल्याचं सांगितलं.
‘आमची एकजूट आहे आणि आम्ही 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्ष INDIAची पुढील बैठक यशस्वीपणे आयोजित करू’, असं पवार म्हणाले.