ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरचीच्या दरात दुप्पट वाढ, आवक वाढली!


नंदुरबार:देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chilli) बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मार्च अखेरपर्यंत नंदुरबार बाजार समितीत दोन लाख 17 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे.



मार्च अखेरपर्यंत नंदुरबार बाजार समितीत दोन लाख 17 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात संपणारा मिरचीचा हंगाम यावर्षी एप्रिलपर्यंत लांबला आहे. यावर्षी विक्रमी अशी आवक झाली आहे. त्यासोबत मिरचीच्या दरातही दुपटीनं वाढ झाल्यानं यावर्षी मिरचीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. मिरची उत्पादनाचा नवीन विक्रम प्रस्थापित झाला असून बाजार समितीत मार्च अखेरपर्यंत दोन लाख 17 हजार क्विंटल ओल्या लाल मिरचीची खरेदी झाली आहे.

बाजार समितीमध्ये गेल्यावर्षी मिरचीला 2500 रुपयापर्यंत दर होते. यावर्षी लाल मिरचीला सरासरी 5100 रुपयापर्यंत दर मिळाला आहे.

मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढले असून त्यामुळं सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्त्वाच्या घटक असलेला चटणीचे दरही वाढले आहेत.

मागील हंगामातील एकूण आवक ही दोन लाख पाच हजार क्विंटल झाली होती. या हंगामात मार्चअखेर ही आवक दोन लाख 17 हजार क्विंटलझाली आहे.

गेल्या वर्षी मिरचीला 2500 रुपये क्विंटल पर्यंतचा दर होता. यावर्षी मिरचीच्या दरात दुपटीने वाढ मिरचीला सरासरी 5100 पर्यंत भाव मिळत आहे.

दर वाढल्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. मिरचीचे दर वाढल्यानं चटणीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button