उत्तर प्रदेशातील मुस्लिम भजन गायिकेच्या भावाची हत्या; ‘हर हर शंभू’ हे भजन गायले
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/08/Screenshot_2023-08-08-13-03-49-46_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये भजन गायन करणाऱ्या एका मुस्लिम गायिकेच्या भावाची भोसकून हत्या करण्यात आली आहे. हिंदू भजन गाण्यामुळे फरमान नाझ ही भजन गायिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती तिचा भाऊ खुर्शिद याला शनिवारी रात्री रत्नापुरी गावातल्या मुहम्मदपूर माफी येथे भोसकून मारण्यात आले, असे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले.
खुर्शिद याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला असून या संदर्भात “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
नाझ ही मुझफ्फूर येथील रहिवासी असून कला म्हणून तिने हे भजन गायले होते. तिने गेल्या वर्षी भगवान शंकरावरील “हर हर शंभू’ हे भजन गायले होते. मुस्लिम महिलेने भजन गाण्याला देवबंद धर्मगुरूंनी आक्षेप घेतला होता.
हे गीत गायन इस्लामविरोधी असल्याचे धर्मगुरूंनी म्हटले होते. नाझ हिने “इंडियन आयडल’ या संगीतावरील रिऍलिटी शो मध्ये देखील भाग घेतला होता. तिचे स्वतःचे युट्युब चॅनेल देखील असून त्याचे 4.5 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.