ताज्या बातम्या

राहुल गांधी यांची ‘संरक्षणविषयक संसदीय स्थायी समिती’वर नियुक्ती


लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात आले आहे. मार्चमध्ये त्यांच्या अपात्रतेपूर्वी, राहुल गांधी संरक्षणविषयक संसदीय पॅनेलचे सदस्य होते.



लोकसभेच्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, काँग्रेस खासदार अमर सिंह यांनाही या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ‘आप’चे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य सुशील कुमार रिंकू यांची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. रिंकू यांनी अलीकडेच जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात त्या एकमेव AAP सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे फैजल पीपी मोहम्मद यांचे देखील लोकसभा सदस्यत्व मार्चमध्ये बहाल करण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवरही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने 2019 च्या त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. राहुल गांधी यांना २४ मार्च रोजी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. गुजरात कोर्टाने त्याला या प्रकरणात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

  • राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा; महाराष्ट्रात चार जिल्ह्यातून होणार प्रवास


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button