हजारोंच्या उपस्थितीत चांडोली येथे दिवंगत शांताबाई डोळस यांना श्रद्धांजली
हजारोंच्या उपस्थितीत चांडोली येथे दिवंगत शांताबाई डोळस यांना श्रद्धांजली अर्पण
खेड : चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे या गावाच्या माजी सरपंच, व रिपब्लिकन पक्षाचे नेते रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, सेवानिवृत्त बॅंक अधिकारी सुर्यकांत डोळस यांच्या मातोश्री, दिवंगत शांताबाई घनश्याम डोळस, यांचा पुण्यानोमोदन दिन व शोकसभेच्या निमत्ताने हजारो नागरीकांच्या उपस्थितीत दिवंगत शांताबाई डोळस यांना विविध पक्ष संघटनेच्या वतीने, श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,
मंगळवार दि. २५ / ७ / २०२३ रोजी सकाळी ठिक ९- ०० वाजता निलकमल मंगल कार्यालय चांडोली टोलनाका तालुका खेड जिल्हा पुणे येथे, येथे डोळस परिवाराच्या वतीने दिवंगत शांताबाई डोळस यांचा पुण्यानोमोदन दिन व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सकाळी ठिक ९ – ०० वाजता भारतीय बौध्दमहासभेच्या वतीने, त्रिसरण पंचशील व धार्मिक गाथेचे पठण करण्यात आले, तदनंतर , रिपब्लिकन पक्ष , भारतीय जनता पक्ष, शिवसेना काॅंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व विविध पक्ष संघटनेच्या वतीने, व चांडोली गावचे सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, खेड पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ, डोळस कुटूंबियाचे पै पाहुणे नातेवाईक यांनी दिवंगत शांताबाई डोळस यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला,
रविवार दि. १६ / ७ / २०२३ रोजी रात्री वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता, सोमवार दि. १७ / ७ / २०२३ रोजी दुपारी ठिक १- ०० च्या दरम्यान त्यांच्या वर भिमातिरी सास्रू नयनाने अंत्यसंस्कार करण्यात आले होते,
दिवंगत शांताबाई डोळस या सन २००० ते २००५ या काळात चांडोली गावाच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या, त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे करण्यात आली होती, गावच्या जडणघडणीत व विकासात त्यांचा मोठा वाटा आहे, त्यांच्या रुपाने एक आदर्श गृहिणी आदर्श माता, मारल्या असल्याची भावना अनेकांनी श्रध्दांजली अर्पण करताना व्यक्त केली, त्यांच्या पश्चात त्यांना रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, सेवानिवृत्त बॅंक अधिकारी सुर्यकांत डोळस, ६ मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे,