इंदापूर तालुक्यात बारा कोटीचे संडास, बाथरूम कुठे बांधलेत – विठ्ठल पवार राजे
इंदापूर तालुक्याचे माजी राज्यमंत्री, पवारांवरील ईडीचे छापे यांचे बाबत वर्तमानपत्रांनी दिलेली माहितीत सत्य मेव जयते…
आमचे संघटनेचे लोक इंदापूर तालुक्यात बारा कोटीचे संडास, बाथरूम कुठे बांधलेला त्याचा शोध घेत आहेत, विठ्ठल पवार राजे यांची माहिती.
नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षांमध्ये भगदाडपडून त्यामधून 35 ते 40 आमदार फुटले आणि ते भाजपच्या गोटात सामील झाले, अनेक आमदार खासदारांनी मंत्र्यांची नावे भ्रष्टाचाराचे यादीत असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे ईडीची सीडी लागलेली आहे. मागील काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळामध्ये असलेले तत्कालीन माजी राज्यमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे चार इंडस्ट्रीतील कारखान्यांमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे ते त्याचे मालक असल्याची बातमी दैनिक लोकमत आणि इतर वर्तमानपत्रांनी दिलेली होती. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आणि अजित पवारांचे समर्थक हे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडल्याच्या नंतर भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यात त्यांचे प्रमुख नेते अजित पवार यांचे पंधराशे कोटी रुपयांची मालमत्ता आणि 65 ठिकाणी किडीचे छापे पडलेत त्या भीतीने ते भाजपच्या गोटात सामील झालेत अशी खात्रीशीर माहिती आहे, यामुळे राष्ट्रवादीतून फुटून गेलेले 35 /40 आमदार खासदारांच्या राष्ट्रवादीला भागधार पाडून अजित पवारांचे टोळीत सहभागी होण्याचे पाठीमागची पार्श्वभूमी ही अता सिद्ध होत असताना लोकांमध्ये चर्चा आहे की इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे चार पाच औद्योगिक कारखान्यांण मध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे हा सर्व पैसा कुठून आनला याबाबत त्यांच्यासह फुटीर आमदारांचे मागे देखील ईडीची बेडी लागल्याची कुण कुण ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पसारलेली आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या टोळीमध्ये घुसून अनेक आमदार खासदारांनी भाजपा पक्षात पळ काढल्याची चर्चा इंदापूर तालुक्या सह पुणे जिल्हात पसरलेली आहे, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ सभागृहात राष्ट्रवादी मधून फुटून गेलेल्या अनेक आमदारांविषयी खोक्यांची संपत्ती जमवल्याने आश्चर्य व्यक्त करत सर्वांच्या गोळ्या उंचावलेल्या राज्यातही चर्चिली जात आहे.
*आज इंदापूर येथील दौर्यात शरद जोशी विचारमंंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की सध्या आमदार खासदारांच्या विक्रीचा बाजार सुरू आहे, या पक्षातून त्या पक्षामध्ये बेडकासारख्या उड्या मारणारे ते आमदार खासदार भ्रष्टाचारी आहे ती आता सिद्ध झालेला आहे, त्यांनी निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आता लपून राहिलेलं नाही. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये मी माहितीची अधिकारांमध्ये माहिती मागितलेली होती, त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा मध्ये बारा कोटीचे संडास बाथरुम बांधलेले आहेत, आमचे लोक त्याचा शोध घेण्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून माहिती घेत आहेत, एकाने जिल्हा परिषद शाळांमध्ये बारा कोटीचे संडास बाथरूम बांधले तर दुसऱ्यांनी पाणी नाही म्हणून डायरेक्ट धरणामध्ये जाऊन पाणी सोडले अशी मुश्किल टिपणी यावेळेस विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांची बोलताना केली.
शिवसेना फुटून गेली तेव्हा सर्व आमदारांना 50 50 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे मग हे कसे गेले असा देखील उलट सुलट चर्चा राज्याच्या मंत्रिमंडळाचा राज्यभर सुरू असल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून गेलेल्या आमदाराच्या भवितव्याचा वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.