राज्यातील बाजार समित्या शेतकऱ्यांच्या लुटीचे संकेतस्थळ -विठ्ठल पवार राजे
राज्यातील बाजार समित्या शेतकऱ्यांच्या लुटीचे संकेतस्थळ, विठ्ठल पवार राजे यांचा आरोप.
पुणे : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी देशातील कोणत्याही राज्यात शेतमाल विकू शकतो अशी तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे त्यामुळे आंध्र किंव्हा तेलंगणा प्रदेशामध्ये शेतमाल अधिकचा दर मिळत असेल त्या ठिकाणी विक्री करणे हा शेतकऱ्यांचा हक्कच आहे. ज्या ठिकाणी शेतमालाला अधिकची रक्कम मिळते त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करावा असे अवहान शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्या मध्ये 25 पैसे किलो कांद्याचे दर तर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली तर भाजीपाल्यामध्ये रोटर फिरवावे लागले त्यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कुठे सेन खात होते का असं संताप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे. केवळ सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणासाठी सत्ता ही काँग्रेस राष्ट्रवादीची कुटील भूमिका राहिलेली असून शेतकऱ्यांच्या सर्व बाजार समिती या काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची पडेल दराने लूट होत आहे, काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यातील बाजार समिती या शेतकऱ्यांच्या लुटीचे संकेतस्थळ अगदी बनलेले आहेत असा आरोपी विठ्ठल भाऊ राजे यांनी केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सोडून परराज्यामध्ये कांदा बटाटा टोमॅटो किंवा इतर शेतमाल अधिकच्या दराने विक्री होत असल्याने सर्व बाजार समितीमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडते व्यापारी दलालांची झोप उडालेली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही नेते अस्वस्थ झालेले आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांवरती काही दलाल शेतकऱ्यांना मध्यस्थी करून पेपरला चुकीच्या बातम्या पसरवून शेतकऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांची व राज्यात फसवणूक झाली हा संभ्रम निर्माण करत असल्याची टीका शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी आज 27 जून रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक फाळके पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील उपस्थित होते.
राजे पवार पुढे म्हणाले की राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल राज्यातील एपीएमसी पेक्षा अधिकचा दर मिळत असेल तर कुठेही विकू शकतात. तेलंगणामध्ये कांद्याला टोमॅटोला अधिकचा भाव मिळतो दुधालाही अधिकचा भाव देण्याची तयारी तेलंगणा आंध्र सरकारने दाखवलेली आहे त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेते मंडळीच्या पोटामध्ये गोळा का उठला आहे हे समजत नाही! शेतमालाला जिथे जास्तीचा दर मिळेल तिकडे शेतकऱ्यांनी तिकडे जाऊन शेतमाल विकावा असेही आव्हान संघटनेने केले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, टोमॅटो उत्पादक शेतकरी 25 पैसे किलो आणि कांदा विक्री होत असताना प्रचंड परिसर होत होता काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजार समितीमध्ये आव्हान का केले नाही? त्यावेळी ती भाकरी फिरवत बसले होते? 25 पैसे किलोने कांदा खरेदी होत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते झोपले होते का.? आताच त्यांना शेतकऱ्याची फसवणूक व्हायला लागली म्हणून बोगस कळवळा यायला लागला का? असा प्रतिप्रश्न संघटनेने विचारलेला आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांचे वाटोळं कोणी केला असेल ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ठराविक नेत्यांनी केलेला आहे असा जोरदार आरोप संघटनेने केलेला आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्ष वाईट नसून त्यांच्या नेत्यांची वागणूक आणि मनस्थिती ही भ्रष्ट प्रवृत्तीची असल्याने दोन्ही पक्ष आणि नेते बदनाम झाले आहेत. शेतकऱ्यांचे लुटीचे कुटील डाव हे या दोन्ही पक्षातील समित्यांमध्ये घेतले जातात . जेव्हा शेतकरी महाराष्ट्र सोडून परराज्यामध्ये थेटपणे शेतमाल विकण्यास तयार झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजार समितीमध्ये अडते व्यापारी दलालांचे धाबे दणाणले आहेत असा संनसनाटी आरोप संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केला आहे.