गुलाबी वादळ महाराष्ट्रात, ‘असा’ आहे केसीआर यांचा दौरा

धाराशिव: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आजपासून दोन दिवसीय सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं आज सोलापूरमध्ये आगमन होणार आहे. तर उद्या ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन के. चंद्रशेखर राव पंढरपूरला येणार आहेत. सोलापूरला येण्यापूर्वी धाराशिवमधील मुरूम येथे के. चंद्रशेखरराव यांच्या दीड हजार कार्यकर्त्यांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह सोलापुरात येणार आहेत. ते उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेणार आहेत. या निमित्तानं बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
के. चंद्रशेखर राव हे आज तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरला येणार आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ते उद्या पंढरपुरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.
विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर सरकोली येथे बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके हे शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यापासून राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर ते आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.