ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक ; १५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश
पुणे : तुळशीधाम रोड, धर्मवीर नगर, या ठिकाणी आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागून ९० मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीने मोठया प्रमाणात धूर झाल्याने इमारतीत अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर ही आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
आशिर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये अचानक आग लागली. आगीने क्षणात पेट घेतला. तसेच या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर इमारतीच्या पतीसरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस, महावितरण विभाग आणि बाळकुम अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीमुळे धूर मोठया प्रमाणात तळ मजल्यावरून बाहेर येऊन इमारतीच्या परिसरात पसरत होता.
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या इमारतीमध्ये अडकलेल्या सुमारे-१५० रहिवाश्यांची पहिल्यांदा सुखरूप बाहेर काढून सुटका आले. या घटनेत त्या इमारती मधील एकूण ९० मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तर मीटर बॉक्सला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तासांनी म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून ही आग शॉटसर्किट मुळे लागली असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.