यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा
नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात.
परंतु भाजीपाल्याची शेतीसाठी योग्य पाण्याच्या आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो. नंदुरबार बाजारपेठेत वांग्याला १२ ते १५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहे. तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीच्या खर्च देखील लागत असल्याने शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होत आहे.
शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतु योग्य नियोजन राहिलं, तर भाजीपाल्यांच्या शेतीतून लाखो रुपयांच्या याच्यात नफा देखील येऊ शकतो, विजय माळी या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने शेती केली, तर कधीही शेतकरी उपाशी राहणार नाही. सध्या शेतकरी खरीपपूर्व मशागत करीत आहे, काही शेतकऱ्यांनी सगळी काम उरकली असून पावसाची वाट पाहत आहेत.