ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार


कल्याण – कल्याण खिडकाळी प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, डोंबिवली येथील आगरी कोळी वारकरी भवन प्रकल्प या दोन्ही विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार ७ जून रोजी होणार आहे. यावेळी दिवा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम ही पार पडणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून सुमारे ही ३२५ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लागत आहे. या विकासकामांच्या पूर्ततेनंतर या शहरांचे रूप पालटणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. तर शहरांमधे अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत आहे. मतदारसंघातील तसेच शहरी भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उद्यानांची उभारणी तसेच सुशोभीकरण, भुयारी गटार, मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण खिडकाळी येथील प्राचीन शिव मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मंजूर करण्यात १०.१८ कोटी रुपयांच्या निधीतून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच बरोबर डोंबिवली शहरातील बेतवडे परिसरात १५ कोटी रुपयांच्या निधीतून आगरी कोळी वारकरी भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेतून या भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. या भवनामध्ये प्रशस्त सभागृह, आगरी कोळी समाजाच्या विविध रूढी आणि परंपरा चित्रफित स्वरूपात दाखविण्यात येणार आहे. तसेच वारकरी संप्रदायासाठी भक्तिमय वातावरण, वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्याची सुविधा असणार आहे. या दोन्ही महत्वाच्या वास्तूंचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन पार पडणार आहे.

असे असेल वारकरी भवन
आगरी, कोळी आणि वारकरी समाजाचा समृद्ध वारसा आणि कलात्मक परंपरा साजरे करण्यासाठी आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी ही वास्तू उभारण्यात आली आहे.या ठिकाणी प्रशस्त असे सभागृह उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी अनेक कलावंतांना त्यांच्या कला सादर करता येणार आहे. या ठिकाणी कार्यशाळा, परिसंवाद आणि व्याख्याने तसेच आगरी आणि कोळी समाजाच्या पारंपारिक पद्धती, लोककथा, कला आणि हस्तकला, संगीत आणि पाककृती याबद्दल माहिती देणाऱ्या चित्रफित दाखविल्या जाणाऱ्या आहे.वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्याची सुविधा असणार आहे. आगरी – कोळी आणि वारकरी संप्रदायाचे विविध स्वरूपात माहिती देण्यासाठी कलादालन

खिडकाळी मंदिर परीसराचे असे होणार सुशोभीकरण
१२ ज्योतिर्लिंग या संकल्पनेवर आधारित त्रिशूळ आकाराचे उद्यान, मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार, वाहनांच्या पार्किंग करिता सुविधा, पूजा साहित्याची विविध दुकाने, मंदिर परिसरात घाट आणि एम्पी थिएटर, भाविकांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृह

दिवा शहरात काय ?
दिवा शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण –
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा शहरातील विविध विकासकामे मार्गी लागत आहे. यातील सुमारे २९९ कोटी ८८ लाख रुपयांच्या कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडणार आहे.
या विकासकामांचा समावेश ,२२१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत नवीन मुख्य जलवाहिनी, देसई खाडी पूल, विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरणव्यायामशाळा, खुला रंगमंच, शाळा इमारत, आरोग्य केंद्र सामाजिक भवन, दातीवली तलाव सुशोभीकरण, देसाई गाव तलाव


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button