निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्टिव मोडमध्ये; मास्टर प्लॅन आला समोर
मुंबई, 6 जून : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता मनसेनं कबंर कसली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकीसाठी मनसेकडून खास प्लॅनची देखील आखणी करण्यात आली आहे. नव्या प्लॅननुसार आता मनसेकडून नाका तिथे शाखा उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. काय आहे मनसेचा नाव उपक्रम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून नाका तिथे शाखा मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नाका नाक्यावर मनसे पदाधिकारी उपस्थित राहून लोकांशी संवाद साधणार आहेत. एका ठराविक वेळी मनसेचे पदाधिकारी नाक्यावरती उपस्थित असणार आहेत. लोकांचे विभागीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेकडून नाका तिथे शाखा मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेसोबत मनसेची युती होऊ शकते अशा चर्चा देखील सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. तर राज ठाकरे यांनी देखील दोनद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र अद्याप दोन्हीही पक्षाकडून युतीबाबत कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नाहीये.