खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार
राज्यासह संपूर्ण भारत वर्षात येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर काल भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन केरळात जवळपास आठ दिवस उशिराने होणार आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 जूनला होणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामानात झालेल्या मोठ्या बदलामुळे आता मान्सूनचे आगमन केरळमध्ये येत्या तीन ते चार दिवसात अर्थातच आठ ते नऊ जून दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर मग पाच ते सहा दिवसात मान्सून तळ कोकणात दाखल होईल आणि मग मुंबईमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अर्थातच यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने होणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक चिंतेची बाब राहणार आहे. मात्र असे असले तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक पूर्वतयारी करून ठेवली आहे. आता मान्सूनचा पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर शेतकरी बांधव पेरणीला सुरुवात करणार आहेत. गेल्या हंगामात मक्याला चांगला दर मिळाला असल्याने या हंगामात मका पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र असे असले तरी मका पिकाच्या सुधारित वाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे जेणेकरून त्यांना पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होईल असं मत जाणकार लोकांनी व्यक्त केल आहे. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मक्याच्या सुधारित जाती. HM-11 :- मक्याची ही एक सुधारित जात असून या जातीची उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड यांसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही उशीरा पक्व होणारी जात आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची पेरणी केल्यानंतर साधारणतः 95 ते 120 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते. संकरित मक्याची ही सुधारित जात मात्र अनेक रोगांना सहन करण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञ लोकांनी केला आहे. या मक्याच्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीपासून हेक्टरी 70 ते 90 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. म्हणजे उच्च उत्पादनासाठी ही जात विशेष ओळखली जाते. उच्च उत्पादनामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये देखील विशेष लोकप्रिय बनली आहे.
पुसा एचक्यूपीएम 5 :- मक्याची ही एक सुधारित जात आहे. ही जात अलीकडेच विकसित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जात 2020 मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही पुसा HQPM 5 सुधारित जात 88 ते 111 दिवसांत काढण्यासाठी तयार होत असते. जाणकार लोकांच्या मते या मक्याच्या सुधारित जातीपासून सरासरी 104.1 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. निश्चितच ही जात वर नमूद केलेल्या जातीपेक्षा अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचा मगदूर पाहून आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने मक्याच्या सुधारित वाणाची निवड करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
पुसा विवेक हायब्रिड 27 :- मक्याची ही देखील एक सुधारित वरायटी म्हणून ओळखली जाते. ही एक लवकर परिपक्व होणारी जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची पेरणी केल्यानंतर साधारणतः 84 दिवसांत पीक हार्वेस्टिंगसाठी तयार होत असते. अर्थातच तीन महिन्यांपेक्षा कमी काळात या जातीपासून उत्पादन मिळू शकते. ही देखील अलीकडेच विकसित करण्यात आलेल्या जातींच्या यादीमध्ये येते. ही जात 2020 मध्ये देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना ४८.५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. अर्थातच ही जात उत्पादनाच्या बाबतीत इतर दोन्ही जातीच्या तुलनेत खूपच मागे आहे.