क्राईममहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई विमानतळावर सव्वासहा कोटींचे सोने जप्त; दोन कारवायांमध्ये एका महिलेसह चौघांना अटक


 

महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दोन कारवायांमध्ये सुमारे १० किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वासहा कोटी रुपये आहे.

आखाती देशातून सोन्याची तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर डीआरआयने शनिवारी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार शारजा येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद उमर मोह हारून फजलवाला व फहिम सलीम वारेवरीया अशी त्यांची ओळख पटली आहे. दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. तपासणीत त्यांच्याकडे सुमारे आठ किलो सोने सापडले असून त्याची किंमत चार कोटी ९४ लाख रुपये आहे. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने मुजदसर अयुब डोजकी याला ताब्यात घेतले. त्याने आरोपींना गुन्ह्यांत मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली. मुजदसर हा गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे. फजलवाला व वारेवारा दोघेही १ जूनला शारजाला गेले होते. तेथून ते दोघेही सोने घेऊन आले होते. या प्रकरणामागे टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

दुसऱ्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारावर दुबईहून आलेल्या दाम्पत्याला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. दाम्पत्यापैकी अफजल अबुबकर वल्लाह याच्याकडे सुमारे दोन किलो सोने सापडले. महिलांच्या ५६ पाकिटांमध्ये सोने लपवले होते. ते जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अफजल विरोधात गुन्हा दाखल करून डीआरआयने त्याला अटक केली. आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी २३ लाख रुपये आहे. याप्रकरणी डीआरआय तपास करत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button