आदिवासी चालकांना नियुक्तीपत्र मिळणार का?
आदिवासी एसटी चालक मागील चार वर्षांपासून नियुक्ती मिळत नसल्याने 15 मे पासून येथील विभागीय नियंत्रण अधिकार्यांच्या कार्यालयासमोर गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्या आमरण उपोषणाची दखल विभाग नियंत्रक गोजारी यांनी येत्या 15 दिवसांच्या आत या आदिवासी चालकांना नियुक्तीपत्र देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
त्याच अनुषंगाने विभागीय नियंत्रक अधिकार्यांनी 7 ते 8 तारखेला समिती निवड करण्याचे लेखी पत्र दिले होते. पण या संदर्भात अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुदेव युवा संघाच्या वतीने विभागीय नियंत्रण अधिकार्यांना 8 तारखेपर्यत कारवाई झाली नाही तर तीव’ आंदोलनाचा इशारा दिला. वर्ष 2019 पासून प्रशिक्षण पुर्ण होवूनही आदिवासी चालकांना नियुक्ती मिळाली नाही. या मागणीसाठी आज गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात विभागीय नियंत्रण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर या आदिवासी वाहनचालकांनी आमरण उपोषण केले होते.
जोपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येत नाही तोपर्यत आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार या आदिवासी चालकांनी केला होता. पण विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून लेखी स्वरुपाचे पत्र दिजं. 15 दिवसांच्या आत नियुक्तीपत्र मिळवून देणार असे आश्वासन दिले. पण या आश्वासनावर अजुनपर्यंत काहीच कारवाई झाली नसल्याने गुरुदेव युवा संघाच्या वतीने तिव’ आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला. यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, प्रवीण व्यवहारे, विनोद राठोड, दिलीप अंबोरे, विकास तोरकड, श्यामसुंदर गेडाम, रघुनाथ कराळे, दशरथ आढाव, प्रशांत कुडमेथे, विकास आत्राम, गोविंदा मडावी, राहूल कनाके, ज्ञानेश्वर इंगळे, शत्रुघ्न वाघमारे, अरविंद कुमरे उपस्थित होते.
नियंत्रण अधिकार्यांना भेटून गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी समिती निवड व नियुक्ती 8 तारखेला देण्यात यावी, अशी आग’ही मागणी केली. अन्यथा विभागीय नियंत्रक कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा यावेळी त्यांनी दिला.