ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

घोरपडीमध्ये लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन


पुणे घोरपडी – बी टी कवडे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केले . तसेच हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, स्वाती मारणे, उज्ज्वला पवार इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार, लव जिहाद प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. यासाठी पाठपुरावा करणार आहे.

यावेळी घोरपडीमध्ये घडलेल्या एका प्रकरणातील पीडीता व तिचे कुटूंबिय सहभागी झाले होते, त्या पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाच्या वेळी जागो हिंदू जागो , हर नारी की यही पुकार , साक्षी के हत्यारों का करो संहार , शासन करो सक्त कडा दुबारा ना हो हत्यारा खडा अशा प्रकारचे विविध संदेश देणारे फलक हातामध्ये घेऊन शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवीत हिंदू महिला- मुली आणि स्त्रियांच्या विरोधात होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि धर्मांतराच्या विरोधात घोषणा देत भारत माता की जय , जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.तसेच पुरुषांनी भगव्या टोप्या व हातामध्ये भगवे झेंडे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button