पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का? भुजबळांनी दिलं उत्तर

नाशिक : पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. शनिवारी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांच्या मनात दु:ख आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमीत शाह यांना भेटणार आहे. हा योग्य मार्ग असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ‘भाजपानं विचार करावा’ दरम्यान पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही. त्या राष्ट्रवादीत येतील असं वाट नाही.
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात अशी चर्चा आहे, यावर भाजपने विचार करावा. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातं अशी चर्चा असताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केलंसंजय राऊत यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे. अशानं वज्रमूठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेच्या राज्यात 48 जागा आहेत. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्यावर चर्चा करू नये असं भूजबळ यांनी म्हटलं आहे.