माजी आमदार अॅड. अवसरे यांचे निधन
भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांचे आज 3 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. 2014 ते 19 या काळात भंडारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते पवनी चे रहिवासी होते. 2019 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, मात्र त्यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात तेवढयाच उत्साहाने सहभागी होत. आज 3 जून रोजी ते आपल्या मुलीकडे बेला येथे असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी जवळील लक्ष हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या 4 रोजी दुपारी 3 वाजता पवनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.