क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक कोटींची धाडसी लूट, पोलिसांनी लावला केवळ आठ तासात छडा


सांगली : एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी लूट करण्याचा प्रकार सांगलीत मंगळवारी रात्री घडला होता. ज्या प्रमाणे चित्रपटात चोरटे एखाद्या उद्योजकाचा किंवा व्यापाऱ्याचा पाठलाग करतात.
त्यानंतर रस्त्यावर संधी साधून त्यांची गाडी आडवतात. अन् काही समजण्यापूर्वी गाडीतील कोट्यवधी रुपयांची लूट करतात तसाच प्रकार घडला. परंतु पुढे पोलिसांनी बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे कामगिरी केली. अवघ्या आठ तासात आरोपींना जेरबंद केले. अर्थात त्यांच्यांकडून सर्व रोकडही जप्त केली आहे.



काय घडले होते

सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटल्याचा प्रकार घडला होता. या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये छडा लावला. या प्रकरणी तीन जणांना अटक करत त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी व त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता. केवलानी यांच्यांकडे असलेली सुमारे 1 कोटी 10 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता.

शेतकऱ्यांसाठी आणले पैसे

केवलानी हे द्राक्ष व्यापारी आहेत. द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1 कोटी 10 लाखांचा रक्कम घेऊन ते आले होते. यावेळी त्यांची ही रक्कम लुटली होती. या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके देखील नेमली होती. पोलिसांनी सांगली जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केली होती.

दरम्यान तासगाव तालुक्यातील याच मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडे आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचा सांगितले. यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले आहे. नितीन यलमार (वय 22),विकास पाटील (वय 32) आणि अजित पाटील (वय 22) असे तिघा संशयितींची नावे आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button