शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी दहावी परीक्षेत 19 माध्यमिक विद्यालयांचा शंभर टक्के निकाल
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी दहावी परीक्षेत 19 माध्यमिक विद्यालयांचा शंभर टक्के निकाल तर 20 माध्यमिक विद्यालयांचा 90 टक्के च्या पुढे निकाल निकालात यशाची परंपरा कायम
एकुण परिक्षास बसलेल्या 1597 विद्यार्थी पैकी 1558 विद्यार्थी उत्तीर्ण
आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी दहावी परीक्षेत 19 माध्यमिक विद्यालयांचा शंभर टक्के निकाल तर 20 माध्यमिक विद्यालयांचा 90 टक्के निकाल लागला असुन निकालात यशाची परंपरा कायम राखली आहे एकुण परिक्षास बसलेल्या 1597 विद्यार्थी पैकी 1558 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावी चा निकाल जाहीर झाला असुन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध 39 माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम जोपासली आहे.आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्थेचे विविध माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल पुढीलप्रमाणे
पंडीत ज. नेहरु विद्यालय, आष्टी 100%,इंदिरा कन्या विद्यालय, धामणगांव 100%,विठ्ठल विद्यालय निमगांव बोडखा 100%,निजाम पटेल विद्यालय मेहकरी 100%,पिंपळेश्वर विद्यालय, पिंपळा 100%,नागनाथ विद्यालय, नागतळा 100%,यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी 100%,जोगेश्वरी विद्यालय पारगांव 100%,राजीव गांधी विद्यालय मातावळी 100%,अश्वलिंग विद्यालय पिंपळवंडी 100%,मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगांव 100%,वृध्देश्वर विद्यालय गहुखेल 100%,श्रीकृष्ण विद्यालय, मातकुळी 100%,संत वामनभाउ विद्यालय पाटसरा 100%,अंबीका विद्यालय बेलगांव 100%,सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण 100%,संत बाळुदेव महाराज विद्यालय, साबलखेड 100% ,प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगांव 100%,आष्टी पब्लिक स्कुल आष्टी 100% या विद्यालयांचा 100% निकाल लागला तर 90%च्या पुढे निकाल लागलेले विद्यालय श्रीराम विद्यालय, कडा ,भैरवनाथ विद्यालय अमळनेर,
श्रृंगेरी विद्यालय ब्रम्हगांव ,जयभवानी विद्यालय, जळगांव , कानिफनाथ विद्यालय निमगांव चोभा, ज्ञानेश्वर विद्यालय, देउळगांव घाट , ज्योतिर्लिंग विद्यालयकानडी बु. ,
क्रांतिसिंह नानापाटील विद्यालय चुंभळी ,पांडुरंग विद्यालय नांदुर ,सय्यदमीर बाबा विद्यालय लोणी ,हरिनारायण स्वामी विद्यालय कर्हेवाडी ,भगतसिंग विद्यालय, किन्ही, पाटोदा उर्दू हायस्कूल पाटोदा,अहिल्याबाई होळकर विद्यालय टाकळी अ , रोडेश्वर विद्यालय डोंगरगण, महेश विद्यालय रुई नालकोल, हनुमान विद्यालय घाटा पिंपरी, श्री माउली विद्यालय बोरुडी, छत्रपती शिवाजी विद्यालय टाकळसिंग,
यशवंत होळकर विद्यालय शिरूर ,या विद्यालयांचा 90%च्या पुढे निकाल लागला आहे. प्रत्येक विद्यालयातुन प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे गुण संपादन केले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ डी बी राऊत, प्रा. शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे ,सर्व प्राचार्य, प्राध्यापक व इतरांनी अभिनंदन केले आहे.