शेतकरी संघटनेच्या वतीने अंभोरा येथे शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली व चिंतन बैठक संपन्न
शेतकरी संघटनेच्या वतीने अंभोरा
येथे शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली व चिंतन बैठक संपन्न
सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कायदेशीर नोटीस ची केली होळी
बीड जिल्हा ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिन्यात सुमारे ३४ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे.त्यानिमित्ताने आज मौजे अंभोरा ता.आष्टी जि.बीड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रद्धांजली व चिंतन बैठक झाली.
या बैठकीत शेतकऱ्यांनी सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लोणी सय्यदमीर नोटीस आल्या यावर काय करता येईल असा प्रश्न उपस्थित केला असता कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी कर कर्जा नहीं देगे बिजली का बिल भी नहीं देगे या शेतकरी संघटनेचे घोषवाक्य वरून व कायदेशिरपणे शेतकरी कर्ज का देऊ शकत नाही व देणे ही लागत नाही याची माहिती दिली. व सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लोणी सय्यदमीर कडून शेतकऱ्यांना आलेल्या कायदेशीर नोटीस ची होळी करत कर्ज भरणार नाही कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कायदेशीर उत्तर देऊ नोटीस आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास अपटे यांनी केले असून यावेळी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गुंड,प्रा.राम बोडखे,सुधिर भद्रे, सरपंच सागर आमले, रहेमान सय्यद,
संतोष गुंड, रिजवान बेग, स्वप्निल थेटे, परमेश्वर घोडके, सरपंच सागर आमले, विष्णु मांढरे संजय खटके,गोरख मूळे,आकाश लोखंडे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.