ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेराजकीय

रशियाचं भारताला सर्वात मोठं गिफ्ट, अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पुतीन यांचा मोठा निर्णय…


अमेरिकेनं H 1B व्हिसासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता, अमेरिकेनं एच 1बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली होती, त्याचा थेट फटका हा भारताला बसला. कारण जगभरातून अमेरिकेकडे H 1B व्हिसासाठी जेवढे अर्ज येतात त्यातील जवळपास 70 टक्के अर्ज हे भारतामधून येतात.

याचा मोठा फटका हा भारतीयांना बसला. दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे आता H 1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या अपॉइंटमेंट तारखा देखील पोस्टपॉन्ड करण्यात आल्या आहेत. 2026 पर्यंत अपॉइंटमेंट पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर एच वन बी व्हिसा देताना आता संबंधित अर्जदाराचे विविध सोशल मिडीया अकाउंट्सची कडक तपासणी केली जाणार आहे.

समजा जर तुमच्या सोशल मिडियावर अमेरिकेविरोधात काही टीका, टीपणी आढळली किंवा संशयास्पद मजकूर आढळून आला तर तुमचा व्हिसा अर्ज तातडीने रद्द करण्यात येणार आहे. अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या नव्या धोरणानुसार अमेरिकेतल्या भारतीय लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, तसेच अमेरिकेत नोकरीसाठी जाणं देखील कठीण झालं आहे, अशा परिस्थितीमध्ये भारताला दोन बड्या देशांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसापूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर होते, यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले, त्यानंतर आता रशियाकडून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार जवळपास एक लाख विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आता रशियामध्ये नोकरीसाठी जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जपान देखील आता भारतीय कर्मचाऱ्यांसाठी उत्सुक आहे. पुढील पाच वर्षांमध्ये दोन्ही देशांत भारत आणि जपानमध्ये तब्बल पाच लाख कामगारांचं अदान-प्रदान होण्याची शक्यता आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुतिन हे भारत दौऱ्यावर असतानाच कामगारांसंदर्भात एक महत्त्वाचा कररा झाला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button