वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या व सीआयडी चौकशी करा
वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या व या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा.. डॉ धर्मराज चव्हाण विभागीय प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी.
वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्यावर शेवगाव जिल्हा अहमदनगर. छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकी दरम्यान झालेल्या गोंधळाबद्दल जा विचारण्यासाठी गेलेले असताना पोलीस निरीक्षक शेवगाव याने 307 व इतर स्वरूपातील गुन्हे दाखल केले. ज्यावेळेस हा सर्व घटनाक्रम घडत होता, त्यावेळेस माननीय किसन चव्हाण सर एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे उपस्थित असून त्यांचा या घटनेची काहीही संबंध नाही, सदरील गुन्हा हा व्यक्ती दोषातून व सूडबुद्धीने नोंदविण्यात आला असून, सदरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकी दरम्यान झालेल्या गोंधळा जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करावी सदरील प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, व किसन चव्हाण सर यांच्यावरील 307 चा गुन्हा मागे घ्यावा. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण, औरंगाबादचे निरीक्षक धम्मपाल सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, शहर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे,युवक महासचिव तुषार गायकवाड, तालुका अध्यक्ष गोविंद कदम, परभणी जिल्हा सचिव गौतम रणखांबे, माजी महासचिव भगवान देवरे जिल्हा संघटक शेख चांद जेष्ठ कार्यकर्ते झोडपे, दक्षिण जिल्हा सचिव रुस्तुम तूप समिंद्रे आदी उपस्थित होते.