जमात ए ईस्लामी हिंद, माजलगाव तर्फे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न
जमात ए ईस्लामी हिंद, माजलगाव तर्फे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न
मांजालगाव (प्रतिनिधी) :- येथील जमात ए इस्लामी माजलगाव शाखेतर्फे राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, प्रेम, जातीय सलोखा वृध्दींगत करण्यासाठी ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात माजलगाव येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शिरखुर्मेचा आस्वाद घेतला
सविस्तर वृत्त असे की,जमात ए ईस्लामी हिंद, माजलगाव तर्फे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात हिंदू मुस्लिम सह सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजका तर्फे संदेश देण्यात आला की आपला देश विविध आस्था,धारमांचा देश आहे. सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणे आवश्यक आहे. हर्ष व उत्साहाची पर्वणी रमजान ईद नुकतीच साजरी करण्यात आली. ईदचा हा आनंद आप्तस्वकियांसह द्विगुणीत व्हावा यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, प्रेम, जातीय सलोखा वृध्दींगत करण्यासाठी ईद मिलन समारोह आयोजित करण्यात आला होता व या वेळी सर्वानी शिरखुर्मेचा आस्वाद घेतला या
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. इंजि. वाजेद कादरी (सामाजिक विचारवंत जमात-ए-इस्लामी हिंद, औरंगाबाद) यानी सांगितले की, आज देशाला एकता, बंधुता ची गरज आहे सर्व समाज बांधवानी मिळून मिसळुण शातंतेने देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, मानसा मानसा मधला भेद विसरुण गुण्यागोविंदाने राहुन सर्व जाती धर्माचा आदर केला पाहिजे तरच आपला देश महासत्ता बनु शकतो जातिवाद मानसिकता असणार्या लोकान पासुन आपल्या पाल्याचें नवयुकाचें रक्षण करा असे त्यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन संदेश दीला यावेळी
प्रमुख अतिथी म्हणुन मा. एस.के. बल्लाळ साहेब (पोलिस निरिक्षक, शहर पो.स्टे. माजलगाव) मा. सय्यद इफ्तेखार सर (जिल्हाध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद, बीड) धमानंद साळवे साहेब, सबाहत अली सयद (जिल्हा अध्यक्ष MPJ) लाभले होते तर सुत्रसंचलन मारुफ इनामदार यानी केले तर प्रस्ताविक तयब सर यानी केले तर आभार शेख़ शौकत यानी माणले या कार्यक्रमा ला यशस्वी करण्यासाठी माजेद खान सर, तयब सर, मारुफ इनामदार,शेख सलीम, इरफान मिर्झा,शेख अलताफ़, शेख जमीर,अलीम भाई, खुर्रम भाई,शेख शौकत, मेहदी हसन,असद सर,मुजमील सर या सर्वानी मोलाचे परिश्रम घेतले व या वेळी सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन जमात-ए-इस्लामी हिंद, माजलगाव तर्फे करण्यात आले होते