पुणे विभागातील मुले परत आंदोलनाच्या पवित्र्यात..
पुणे : पुणे विभागातील मुले परत आंदोलनाच्या पवित्र्यात..
मागील चार वर्षापासून एसटी महामंडळामध्ये नोकरीसाठी जंग जंग पछाडणाऱ्या पुणे विभागातील मुलांची व्यथा ऐकून न ऐकल्यासारखी हे महामंडळ करत आहे.
एसटी महामंडळ सरळ सेवा भरती सन 2019 मध्ये (दुष्काळग्रस्त) भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी फडणवीस सरकार च्या काळामध्ये 12 विभागांमध्ये 4416 जागांसाठी चालक तथा वाहक पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती.ज्यामध्ये 11 विभागांची भरती ही एसटी महामंडळाने पूर्ण केलेली आहे.व ते सर्व मुले सध्या सेवेमध्ये रुजू आहेत.पण फक्त पुणे विभागाची भरती यांनी थांबून ठेवलेली आहे.सर्वात जास्त जागा या विभागात असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी पुणे विभागात फॉर्म भरला.फेब्रु. 2019 मध्ये पुणे विभागात या मुलांची लेखी परीक्षा घेण्यात आली.त्यानंतर त्यांची कागदपत्र छाननी करण्यात आली.त्यानंतर शारीरिक चाचणी मग मेडिकल या सर्व मुलांमधून भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था येथे 2982 मुलांना अंतिम वाहन चाचणीसाठी 17 फेब्रुवारी 2020 पासून बोलावण्यात आले. पण यातील 2240 जणांची ट्रायल झाल्यावर भोसरी येथील ट्रॅक 25 फेब्रुवारी 2020 रोजी बंद पडला व तेव्हापासून तो बंदच आहे.आज आपल्या राज्यात समृद्धी महामार्ग एवढा जलद गतीने झाला,महा मेट्रोचे काम एवढ्या जलद गतीने होत आहे,तर भोसरी येथील जेमतेम 100 मीटर चे ट्रॅक तयार करायला यांना एवढे वेळ का लागत आहे.ट्रायल राहिलेल्या 742 व ट्रायल झालेल्या 2240 मुलांच्या भवितव्यासोबत हे महामंडळ खेळत आहे.म्हणून पुणे विभागातील मुले 20 फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले होते.त्यावेळेस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखर चन्ने साहेब यांनी मुलांना आश्वासन दिले होते की येणाऱ्या एक मेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तो ट्रॅक चालू करून तुमची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.पण आतापर्यंत हे ट्रॅक दुरुस्त झालेले नाही किंवा मुलांना मेडिकलचे किंवा ट्रायलचे मेसेज आलेले नाहीत.यावरून असे कळते की एसटी महामंडळ दिलेला शब्दाला जागत नाही. दिल्याची दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे एसटी महामंडळातील 300 मुले परत 15 मे 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे परत आमरण उपोषण करत आहेत.यांना दरवेळेस ट्रॅकचे कारण पुढे केले जाते.आता या मुलांची सहनशक्ती संपलेली आहे.भविष्यात याचा काही उद्रेक झाल्यास किंवा यांच्या जीवितास काही भले वाईट झाल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार, एसटी महामंडळ मुंबई,आणि एस टी महामंडळ पुणे विभाग हे जबाबदार राहतील.असे पुणे विभागातील मुलांनी बीडच्या जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब,देवेंद्रजी फडवणीस साहेब,शेखर चन्नै साहेब (उपाध्यक्ष एस टी महामंडळ) अजित गायकवाड साहेब (महाव्यवस्थापक एसटी महामंडळ), विभाग नियंत्रक (विभागीय नियंत्रक कार्यालय पुणे) यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे.